Shri Gopalrao Narayan Akshikar
श्री गोपाळराव नारायण अक्षीकर
Shri Gopal Rao was born into the Patil family, popularly known as Akshikar Patil,
a resident of Akshi village near Alibaug in Raigad district, which is famous
for getting the right of Patilki from the state of Angriya. Primary education
was done in Akshi village primary school and after fourth grade he joined John
Elphinstone Haya School of Scottish Mission, Alibaug for secondary education.
After completing the sixth standard, Gopalrao went to Pune and on 2nd January
1880, he joined the “New English School” founded by the idealistic trinity of
Chiplunkar, Agarkar and Tilak. He matriculated from there. Later spent two
years in Fergusson College, Pune. Gopal Rao had the noble culture of selfless
life of idealistic teachers with independent and noble thoughts. After that
he came to Mumbai. After coming to Mumbai, he started as a teacher in
“Maratha High School” for a few days.
Then Gopalrao Akshikar Was Inspired by the culture of Tilak,
Chiplunkar devoted himself to the work of spreading education.
Akshikar started the Marathi School and the Dadar English School
(Chabildas) at Dadar in June 1889. Similarly, Kalyan English School
(Subhedarwada) was inaugurated on 2 January 1890. These schools
which have been started should come under the auspices of a well-established
central institution. Akshikar with the help of his colleagues founded the
General Education Institute on 24th April 1892 and decided the scope of the institute as Mumbai, Thane, Kalyan. Accordingly, the organization was registered on 10 August 1892. Then, in 1892, the New English School (MOH Vidyalaya) was started in Thane. In this way, Gopal Narayan Akshikar his colleague Late Mr. Keshavrao Bhagwant Tamhane, Late Mr. Ganesh Ramchandra Lele, late Mr. Vasudev Kashinath Oak,
Cai. Hari Vishnu Kolhatkar, Mr. Ramchandra Kashinath Oak and Cai. With the help of Rajaram Keshav Vaidya, the saplings of this institution were planted, cultivated and raised.
The work of creating interest in education in Bahujan society. Akshikaran did. Through his tireless work and direct harmony in the Bahujan society, Akshikar did the work of spreading education with great earnestness, longing and ambition. Sir Leslie Wilson, the then Governor of Bombay Province, awarded Gopalrao Akshikar the title of "Father of Bahujan's Education" (this title).
General Education Institute, Dadar, Mumbai- 28 This institution is completing 130 years of establishment and under the auspices of this institution there are 9 secondary schools, 8 junior colleges and one women's college, 8 pre-primary schools, 8 primary schools and English The medium has 2 pre-primary, 2 primary and 2 secondary schools and 2 CBSE schools, 2 international schools. Akshikar's vow to educate the Bahujan community has been relentlessly carried out by the organization. At present around 16300 students are studying in this institution and the number of teachers working in the institution is 519 and the number of non-teaching staff is 222.
The original founder of the organization, father of education of Bahujan Samaj Kai. Regards to Gopal Narayan Akshikar.
रायगड जिल्हयातील अलिबाग जवळ अक्षी या गावचे राहणारे अक्षीला पाटील या उपनावाने प्रसिध्द, आंग्रंयाच्या राज्यापासून पाटीलकीचा
अधिकार मिळाल्यामुळे प्रसिध्द असलेले पाटील घराणे,
त्या घराण्यात गोपाळरावांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण अक्षी गावच्या प्राथमिक शाळेत झाले तर चौथीनंतर अलिबागच्या स्कॉटीश
मिशनच्या जॉन एल्फिन्स्टन हया शाळेत माध्यमिक शिक्षणासाठी
दाखल झाले. सहा इयत्ता झाल्यावर गोपाळराव पुण्यांस गेले व 2 जानेवारी 1880 रोजी चिपळूणकर, आगरकर, टिळक
या ध्येयवादी त्रिमूर्तीनी स्थापन केलेल्या “न्यू इंग्लिश स्कूल,” मध्ये दाखल झाले.तेथूनच ते मॅट्रीक झाले.नंतर पुण्याच्या
फर्ग्युसन कॉलेजमध्ये दोन वर्षे काढली.स्वतंत्र व उदात्त विचारांच्या ध्येयवादी शिक्षकांच्या त्यागी जीवनाचा थोर संस्कार गोपाळरावांच्या
मनावर झाला.त्यानंतर ते मुंबईत आले.मुंबईत आल्यावर काही दिवस “मराठा हायस्कूल” मध्ये त्यांनी शिक्षक म्हणून सुरूवात केली.
त्यानंतर गोपाळराव अक्षीकरांनी लो. टिळक, चिपळूणकर यांच्या संस्काराने प्रेरित होऊन शिक्षण प्रसाराच्या कार्याला वाहून घेतले.
अक्षीकरांनी जून 1889 मध्ये दादर येथे मराठी शाळा व दादर इंग्लिश स्कूलची (छबिलदास) सुरूवात केली. त्याचप्रमाणे 2 जानेवारी
1890 मध्ये कल्याण इंग्लिश स्कूल (सुभेदारवाडा) ची मुहूर्तमेढ केली. सुरू झालेल्या या शाळा सुस्थापित मध्यवर्ती संस्थेच्या अधिपत्याखाली
याव्यात त्यासाठी कै. अक्षीकरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने 24 एप्रिल 1892 रोजी जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूटची स्थापना केली व
संस्थेचे कार्यक्षेत्र मुंबई, ठाणे, कल्याण असे ठरवले. त्याप्रमाणे 10 ऑगस्ट 1892 रोजी संस्था रजिस्टर करण्यांत आली. त्यानंतर 1892
मध्येच ठाणे येथे न्यू इंग्लिश स्कूल (.मो.ह. विद्यालय,) ठाणे येथे शाळा सुरू केली. अशाप्रकारे कै. गोपाळ नारायण अक्षीकर यांनी
आपले सहकारी कै. केशवराव भगवंत ताम्हाणे, कै. गणेश रामचंद्र लेले, कै. वासुदेव काशिनाथ ओक,
कै. हरी विष्णु कोल्हटकर, कै. रामचंद्र काशिनाथ ओक व कै. राजाराम केशव वैद्य यांच्या सहकार्याने या संस्थेचे रोपटे लावले, जोपासले,
वाढविले.
बहुजन समाजाामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे काम कै. अक्षीकरांनी केले.आपल्या अथक परिश्रमातून आणि बहुजन समाजात
प्रत्यक्ष समरस होऊन अत्यंत कळकळीने, तळमळीने आणि ध्येयवादाने अक्षीकरांनी शिक्षण प्रसाराचे काम केले.मुंबई प्रांताचे तत्कालीन
गर्व्हनर सर लेस्ली विल्सन यांनी गोपाळराव अक्षीकरांना “बहुजनांच्या शिक्षणाचा जनक” (हे बिरूद) हा किताब बहाल केला होता.
जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट, दादर, मुंबई- 28 या संस्थेच्या स्थापनेला 130 वर्षे पूर्ण होत असून या संस्थेच्या अधिपत्याखाली मुंबई,
ठाणे, रायगड या जिल्हयांत 9 माध्यमिक विद्यालये, 8 कनिष्ट महाविद्यालये व एक महीला महाविद्यालय तसेच 8 पूर्व-प्राथमिक शाळा,
8 प्राथमिक शाळा तसेच इंग्रजी माध्यमाच्या 2 पूर्व-प्राथमिक, 2 प्राथमिक व 2 माध्यमिक शाळा व 2 सी.बी.एस.ई.स्कूल,
2 इंटरनॅषनल स्कूल आहे.कै.अक्षीकरांचे बहुजन समाजाला शिक्षण देण्यांचे व्रत निरलसपणे सातत्याने संस्था करीत आहे.
या संस्थेत आजच्या घडीला जवळपास 16300 विद्यार्थी शिक्षण घेत असून संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षकांची संख्या 519 इतकी
असून शिक्षकेतर कर्मचारी संख्या 222 एवढी आहे.
संस्थेचे आद्य संस्थापक, बहुजन समाजाच्या शिक्षणाचे जनक कै. गोपाळ नारायण अक्षीकर यांना विनम्र अभिवादन.
.